निवडणूक तयारीला वेग; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची EVM व मतमोजणी ठिकाणांना भेट.
सोलापूर : सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक तयारीला वेग आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज मतदान यंत्रे (EVM) ठेवण्यात आलेल्या ठिकाणांची तसेच मतमोजणी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.मतदान यंत्रांची सुरक्षितता, साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि प्रवेश-निर्गमन मार्ग याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांवर असल्याचे डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले. प्रशासन निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?